जोशी योद्धा होते. योगी होते. व्यासंगी होते. विद्वान होते. धोरणी होते. हळवे होते. पण त्यांचा सगळा अट्टाहास हा स्वातंत्र्यासाठी होता.
दारिद्र्यानं गांजलेला, व्यापाऱ्यांनी नाडलेला आणि राजकारणानं पिचलेला शेतकरी जेव्हा शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली एक होऊ लागला, तेव्हा त्याला जातीचे, धर्माचे आणि भाषेचे भेद दिसायचे बंद होत गेले. लौकिक अर्थानं कमी शिकलेल्या, एका कोशात जगणाऱ्या शेतकऱ्याला आर्थिक स्वातंत्र्याचे अति क्लिष्ट विचार शिकवण्याचा जो महाकाय पराक्रम जोशींनी करून दाखवला तो एकमेवाद्वितीय होता.......